MNS BMC Elections: चर्चेआधीच MNS ची फिल्डिंग, 227 पैकी 125 जागांची यादी तयार
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) स्वबळावर तयारी सुरू केली असून, संभाव्य युतीच्या चर्चेआधीच ठोस पावले उचलली आहेत. जागावाटपाच्या चर्चेआधीच मनसेकडून आता सव्वाशे जागांची यादी तयार करण्यात आली आहे. मनसेने मुंबईतील सर्व २२٧ जागांचा आढावा पूर्ण केला असून, १२५ जागांवर विजयाची क्षमता असलेले उमेदवार असल्याचे म्हटले आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच मनसेने आपली मागणी आणि तयारी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement