Nagpur Protest: नागपुरात शहरात साचलेल्या कचऱ्याविरोधात काँग्रेस आक्रमक,पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Continues below advertisement
नागपूर महानगरपालिकेतील (Nagpur Municipal Corporation) कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस (Congress) नेते आणि आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले. 'आम्ही वारंवार पालिका प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा काहीही हालचाली झालेल्या नाहीत', असा आरोप करत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी लावलेले बॅरिकेडिंग तोडून आंदोलकांनी थेट पालिका आयुक्तांच्या कार्यालयात प्रवेश केला, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. आमदार विकास ठाकरे आणि काही कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनात बसून होते, तर पोलिसांनी इतर कार्यकर्त्यांना बाहेर काढले. महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे मनपा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते व मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement