Bacchu Kadu : शेतकऱ्यांनी जीवन संपवण्यापेक्षा आमदाराला कापा; बच्चू कडू आक्रमक
Continues below advertisement
प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा,' असे संतप्त विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा आणि निळा अशा रंगांमध्ये विभागून त्यांच्यात फूट पाडल्याचा आरोपही कडूंनी केला. शरद जोशी (Sharad Joshi), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या (Dr. Babasaheb Ambedkar) मोठ्या नेत्यांना जनतेने निवडणुकीत पाडले, कारण ते जातीच्या राजकारणात बसले नाहीत, असेही ते म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, तर देशात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement