PM Modi Threat : 'तुम्हाला उडवून देऊ', काँग्रेस खासदार Prashant Padole यांची PM Modi, Fadnavis यांना धमकी
Continues below advertisement
भंडारा-गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिलेल्या धमकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस, यापुढे जीवन संपवणार नाही, तर आम्ही तुम्हाला उडवून देऊ', असा खळबळजनक इशारा प्रशांत पडोळे यांनी दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरीविषयक धोरणे बदलावीत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पीक विम्यापोटी केवळ १८ रुपये मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडोळे यांचे वक्तव्य 'बालीशपणाचे' असल्याचे म्हणत, बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement