Post Office Scam:नागपूर पोस्टात कोट्यवधींचा घोटाळा, विड्रॉल स्लिपवर सह्या घेत फसवणूक

Continues below advertisement
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला असून, पोस्ट मास्टर सिंधूबाई बाळबुधे यांच्यावर सव्वा कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप आहे. 'आत्ता तिनं सांगितलं मला, पासबुकात तुझ्या एकही पैसा नाही,' या एका गावकरी महिलेच्या प्रतिक्रियेतून फसवणुकीची तीव्रता समोर येते. दिग्रस, वंडली, येरळा अशा अनेक गावांतील शेकडो शेतकरी आणि मजुरांनी मोठ्या विश्वासाने ठेवलेल्या पैशांची अफरातफर झाल्याचा आरोप आहे. आरोपी पोस्ट मास्टर सिंधूबाई बाळबुधे यांनी गावकऱ्यांकडून पैसे भरण्याच्या स्लीपऐवजी पैसे काढण्याच्या स्लीपवर सह्या घेतल्या. तसेच, आरडी (RD) आणि एफडी (FD) खात्यांमध्ये पैसे न टाकता बनावट पासबुक देऊन त्यांची फसवणूक केली. अनेक पीडितांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी ही रक्कम जमा केली होती, मात्र आता त्यांची आयुष्यभराची कमाई धोक्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola