Congress Maharashtra: पंतप्रधानांच्या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतलीय. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असं सांगत या वक्तव्याविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलनाची घोषणा केलीय. भाजपच्या सर्व कार्यालयांसमोर उद्या मोदीजी माफी मांगो, असं आंदोलन काँग्रेस करणार आहे. राज्यातले भाजप नेते पंतप्रधानांच्या वक्तव्याचं समर्थन करत असतील तर ते महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीकाही पटोले यांनी केलीय.
Continues below advertisement
Tags :
Congress Nana Patole PM Modi Narendra Modi PM Support Aggressive Role Insults Modiji Apology Anti-Maharashtra