राज्यपालनियुक्त 12 जागांचा प्रस्ताव राज्यपालांकडे; वनकरांना संधी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी

Continues below advertisement

महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यांनी यांना देण्यात आला आहे. शिवसेनेच अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली. आज दिलेल्या बारा नावात दोन नावे विशेष आहेत.

वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढलेले यशपाल भिंगे यांचं नाव राष्ट्रवादीकडून देण्यात आलं आहे. यशपाल भिंगे यांच्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. तर वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूर विधानसभा लढलेले अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसने संधी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram