Maratha Reservation| आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी पंढरपूर - मंत्रालय पायी दिंडीला आजपासून सुरुवात
Continues below advertisement
मराठा आरक्षण प्रश्नावरून आज निघणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चास मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला असून दुपारी एक वाजता नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. काल रात्री उशिरा प्रशासनासोबत झालेल्या चर्चेतून एक प्रस्ताव तयार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार मोजक्या 10 ते 15 आंदोलकांना नामदेव पायरीचे दर्शनासाठी सोडण्यात येणार असून त्यानंतर पायी आक्रोश मोर्चा शहर पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ देत. येथून त्यांना पोलीस वाहनातून मंत्रालयाकडे पाठविले जाईल. जेथे शासनाच्या वतीने अधिकारी या आंदोलकांशी चर्चा करतील. सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सुरू असल्याने कोणताही मंत्री या आंदोलकांशी चर्चा करणार नाही.
Continues below advertisement
Tags :
Maratha Kranti Mashal Morcha Bandra Matoshree Pandharpur Maratha Reservation CM Uddhav Thackeray