Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
नव्या भिडूबाबत काँग्रसेची भूमिका जवळपास निश्चित झालीय...नको मनसे नको एमआयएम...अशी काँग्रेसची भूमिका पक्की झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये एमआयएम आणि मनसेसोबत जायचं नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन दिवसांच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत मनसे किंवा एमआयएमबाबत एकही प्रस्ताव आला नसल्यानं दोन्ही पक्षांसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिलीय..तसंच ज्या ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र आहेत त्या ठिकाणीही सोबत जायचं नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ...त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत उत्सुक असलेले उद्धव ठाकरे काँग्रेसबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे....