Congress Delhi : शिवसेना ठाकरे गटाच्या दबावाखाली झुकणार नाही; काँग्रेसची स्पष्ट भूमिका

Continues below advertisement

Congress Delhi : शिवसेना ठाकरे गटाच्या दबावाखाली झुकणार नाही; काँग्रेसची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Nivadnuk 2024) बिगुल वाजलं आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात राज्यभरात (Maharashtra News) मतदान पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. फार कमी दिवस हातात असल्यामुळे राज्यातील दोन्ही आघाड्यांकडून जागावाटपाचा तिढा सोडवण्याची धडपड सुरू आहे. पण, याच जागावाटपावरुन महाविकास आघाडीत खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात काहीतरी कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच, शिवसेनेच्या दबावाखाली झुकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका दिल्लीतील काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींकडून घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि शिवसेनेमुळे महाविकास आघाडीची समीकरणं बिघडणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहेत. 

काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागावाटपाचा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.  विदर्भातील एकही जागा ठाकरेंच्या शिवसेनाला सोडण्यास काँग्रेस तयार नसल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटानं दावा केलेल्या 12 जागांपैकी एकंही जागा काँग्रेस सोडायला तयार नाहीत. विदर्भातील काँग्रेस नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत. महाराष्ट्रातील नेते विदर्भातील जागा सोडू नयेत, अशी मागणी काँग्रेस हायकमांडकडे करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram