MNS Yuit Politics: काँग्रेसमध्ये मनसेवरून दोन गट, आघाडीवरून नेत्यांमध्येच संभ्रम
Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यातील संभाव्य आघाडीवरून काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचे चित्र समोर आले आहे. या चर्चेला काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे बळ मिळाले आहे. 'मनसेच्या आघाडीच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आणि अशी कुठल्याही प्रकारची चर्चाही काँग्रेसने मनसेसोबत केलेली नाही,' असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांना आघाडीचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे संकेत दिले आहेत. नाशिकमध्ये स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मनसेसोबत आघाडीची घोषणा केली असताना, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना याबाबत माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीवरून काँग्रेस नेतृत्वात एकवाक्यता नसल्याचे आणि संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement