Solapur Toll Naka : सोलापूर-अक्कलकोट रोडवर प्रवाशांची लूट, दोनदा भरावा लागतो टोल
अक्कलकोट रोडवर प्रवास करणाऱ्याना दोन वेळेस टोल भरावं लागत आहे. सोलापूर-गाणगापूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विकसीत केला आहे. या रस्त्याचे जवळपास 84 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूर ते अक्कलकोट दरम्यान वळसंग येथे टोल प्लाझा सुरू करण्यात आला आहे. मात्र याच रस्त्यावर कुंभारी येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचा जुना टोल प्लाझा आहे. या ठिकाणी जड वाहतूक, माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांकडून टोल वसुली अद्याप ही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी टोल भरावा लागत आहे. अशीच काहीशी परिस्थिती सोलापूर-कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर देखील आहे. सोलापुरातील देगाव येथे राज्य शासनाचा जुना टोल प्लाझा अद्याप ही सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे टोल बंद करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाला दिलेला होता. मात्र तरी देखील टोल वसुली सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सोलापूर-गाणगापूर राष्ट्रीय महार्गावरील टोल वसुलीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी...