ABP News

Shahira Keshar Jainu Chand : कॉ. अमर शेख यांच्या कला पथकातील शाहिरा केशर जैनू चाँद यांचे दु:खद निधन

Continues below advertisement

लोकशाहीर कॉ. अमर शेख यांच्या कला पथकातील सहकारी शाहिरा केशर जैनू चाँद यांचे दु:खद निधन झालंय. मुंबईतील सातरस्ता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. वृद्धापकाळाने वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. शाहिरा यांनी पती जैनू चाँद, अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गिरणी कामगारांच्या चळवळीत प्रबोधनाचं मोठं काम केलंय. शाहिरा केशर चाँद याच्या निधनामुळे पुरोगामी, समतावादी चळवळीचा दुवा निखळल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram