Panvel, Kamothe मधील CNG पंप बंद, मुंबई गोवा हायवेवरील सीएनजी पंपावर गाड्यांची मोठी गर्दी

नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, भागात असलेले सीएनजी पंप बंद असल्यामुळे मुंबई गोवा हायवेवर असणाऱ्या सीएनजी पंपावर गाड्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवाशांच्या माहितीनुसार पूर्ण हायवेला केवळ 2 ते 3 सीएनजी पंप आहेत ते देखील बंद आहेत. त्यामुळे पुढील प्रवास आम्ही कसा करायचा असा सवाल उपस्थित केला आहे. सध्या बांधनवाडी नजीक असलेल्या सीएनजी पंपावर अनेक प्रवाशी दीड ते दोन तास ताटकळत बसले आहेत. प्रवाशांच्या माहितीनुसार पनवेल आणि कामोठे परिसरात असलेल्या पंपांवर मशीन बंद असल्याची कारणे देण्यात येत आहेत. त्यामूळे एकाच वेळी अनेक पंपांवरील मशीन कसे काय बंद पडले असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola