CNG PNG Rate Hike : महागाईच्या झळा आणखी वाढल्या, CNGचे साडेतीन तर PNG दीड रुपयांनी महागणार

Continues below advertisement

दसरा-दिवाळीनंतर आता महागाईच्या झळा आणखी वाढल्या आहेत. महानगर गॅसनं सीएनजीच्या दरात प्रतिकिलो साडेतीन रुपयांनी वाढ केलीय. तर पीएनजीचे दरही दीड रुपयांनी वाढवण्यात आलेत. त्यामुळे मुंबईत सीएनजी आता 89 रुपये 50  पैसे किलो इतका झालाय. तर पीएनजी प्रति एससीएम 54 रुपये इतका झालाय. एकीकडे गॅस महागला असताना दुसरीकडे पुढच्या तीन महिन्यांत महागाई वाढणार असल्याचं भाकित एसबीआयच्या अहवालात करण्यात आलंय. पुढच्या तीन महिन्यांत धान्य, भाज्या, दूध आणि तेल महागणार असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे धान्याचा तुटवडा होऊन महागाई वाढणार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram