Ayodhya Tour | अयोध्या दौऱ्य़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरयू आरती करणार नाही : सूत्र
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अयोध्या दौऱ्य़ावर जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. मात्र, ठाकरेंना या दौऱ्यात शरयू आरतीमध्ये सहभागी होता येणार नसल्याचं कळतंय. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं उत्तरप्रदेश सरकारनं एक नियमावली तयार केलीय. त्यानुसार ठाकरेंना शरयु आरतीमध्ये सहभागी होता येणार नसल्याचं कळतंय. दरम्यान, शिवसेनेनं हिंदुत्वाची कास सोडली नसल्याचं अधोरेखित करण्यासाठी हा अयोध्या दौरा होत असल्याची चर्चा आहे. कालच ठाणे आणि नाशिकमधून काही शिवसैनिक अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
Continues below advertisement