कोरोनाविरोधातील युद्धात शस्त्र पराजून ठेवण्याची हिच वेळ : CM Uddhav Thackeray
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. अशातच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलानं आज 'माझा डॉक्टर' ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी आणि परिषदेत उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला. या परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि जनतेला मार्गदर्शनही केलं. यावेळी त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना मंदिरं उघडण्याच्या आंदोलनांवरुन विरोधी पक्षांना सुनावलं आहे. ते म्हणाले की, "अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण कोरोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको."