Uddhav Thackeray | येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तुळजापूरमधील काटगाव इथे पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभं करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही, जे करुन ते तुमच्या समाधानासाठी करु, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले की, "मी तुम्हाला नवीन नाही किंवा तुम्ही मला नवीन नाही. तुमच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. या वर्षाची सुरुवात जागतिक संकटाने झाली, वादळ आलं आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला आहे. पुढचे सात-आठ दिवस परतीचा पाऊस कायम असेल. तुम्ही माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहात. संवग लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही. मी जे बोलते ते करतो, पण जे करु शकत नाही ते बोलणार नाही. तुम्हाला बरं वाटावं, तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणून मी आकडा घोषित करायला आलेलो नाही. तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्हाला जास्तीत जास्त ताकद द्यायला आलो आहे."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola