CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या केंद्राकडे 3 मोठ्या मागण्या : ABP Majha

मुख्यमंत्री म्हणाले की, पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवण्याचा सूचना देखील आल्या आहेत. वडनेरे समितीसह सर्व समित्यांचे अहवाल एकत्र करून योग्य तो आराखडा करण्यात येईल. तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज. त्यात पूर व्यवस्थापन, दरडी का कोसळतात या अनुषंगाने उपाय शोधण्यात येतील. यापुढे विकास कामे करताना होणारा  फायदा व नंतर निसर्ग , पर्यावरण या अनुषंगाने भविष्यातील होणारा तोटा याचा विचार करावा लागेल. आम्ही मागणी केली आहे. केंद्राने आता एनडीआरएफचे निकष सुधारावेत, व्यावसायिक, व्यापारी यांना विम्याची रक्कम महसूल विभागाच्या पंचनाम्यावर मिळावेत, असं ते म्हणाले. 

ते म्हणाले की, सहाही जिल्हे पूर परिस्थितीपूर्वी कोरोनाशी लढताहेत.  सांगली परिसरात चाचणी वाढावा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांचे जीव वाचविणे माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे  राज्यात आज 1250 ते 1300 मेट्रिक टन ऑक्सिजन आपण दररोज उत्पादन करवतो पण मध्यंतरी ऑक्सिजनचा इतका तुटवडा आहे. पुढची जी लाट आहे त्यात केंद्राने देखील आपल्याला निर्देश दिले आहेत. या संभाव्य लाटेत दुपटीपेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल, असं ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola