CM Uddhav Thackeray | डॉक्टर, नर्सेससोबत गैरवर्तन कराल तर खबरदार : उद्धव ठाकरे
आपली जात, देश, धर्म कुठलाही असो, व्हायरस मात्र एकच आहे. आपण कोरोनासोबत लढा देत आहोत. या लढाईत डॉक्टर, नर्सेससोबत काही विकृती गैरवर्तन करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा विकृतींची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोनाच्या या लढाईत काही विकृती समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान फेक व्हिडीओ पाठवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.