Sharad Pawar meets PM Modi : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेऊनच भेट, सूत्रांची माहिती

दिल्लीत असलेल्या शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानं, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय... विशेष म्हणजे शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोदींसोबतच्या भेटीली पूर्वकल्पना दिली होती अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय. शरद पवार आज सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले... जवळपास तासभर दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरु होती.. राज्यात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांमध्ये ईडी हात धुवून लागली आहे.. तसंच  केंद्र सरकारनं नव्यानं स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयावरुन जोरदार राजकारण सुुरु आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. दरम्यान काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत होते. त्यामुळं या गाठीभेटींच्या सिलसिल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola