Maharashtra Unlock : मला लोकांचा जीव महत्त्वाचा, मुख्यमंत्री ठाकरेंनी हॉटेल मालकांना ठणकावलं
नव्या नियमावलीनुसार काय सुरु, काय बंद?
शॉपिंग मॉलसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी दुकाने, मॉल बंद राहतील.
सर्व सार्वजनिक उद्याने आणि मैदाने व्यायामाच्या उद्देशाने खुली ठेवता येणार.
सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवता येणार आहेत. मात्र शक्य असेल्यास वर्क फ्रॉम होम सुरु ठेवावं.
सर्व कृषी उपक्रम, बांधकामे, औद्योगिक कामे, माल वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करता येणार आहे.
व्यायामशाळा, योग केंद्रे, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरु 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार. मात्र एसीचा वापर करता येणार नाही. रविवारी ही सेवा बंद राहणार.
सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉलच्या आतील) पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार.
राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
राज्य शिक्षण विभागाचे आदेश शाळा आणि महाविद्यालयांसाठी लागू राहतील.