Balasaheb Vikhe Patil | काँग्रेसमध्ये कोंडलेल्या हिऱ्याला बाळासाहेब ठाकरेंनी कोंदण दिलं :मुख्यमंत्री
'मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, जुने ऋणानुबंध आहेत. मूर्ती छोटी पण कीर्ती महान, अजूनही समोर आहेत असंच जाणवतं. अडचणींचा सामना करत नाही तर जिद्दीने अडचणींवर मात करत पुढे येणार विखे पाटील यांचे घराणे आहे. व्यवस्थेचा दुष्काळ बाळासाहेब विखे पाटील यांनी दूर केला. एवढचं नाहीतर अश्यक्य वाटणाऱ्या गोष्टीही सत्यात आणल्या. इंदिरा निष्ठ घराणं होतं त्यांना कसे घ्यायचे? हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी केला नाही. काँगेसमध्ये कोंडल्या गेलेल्या हिऱ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी कोंदण दिलं. मला या कार्यक्रमाला नसते बोलावले, तर मी नक्की रागावलो असतो. आपण पक्ष सोडून एकत्र काम करू. पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद आपल्यावर आहेतच.' , असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
Tags :
Balasaheb Vikhe Patil Autobiography Radhakrishna Vikhe Patil PM Modi Speech BJP CM Uddhav Thackeray PM Modi