CM Thackeray : कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार : मुख्यमंत्री
मुंबई : कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार राज्यावर कायम आहे. त्यामुळे कोरोना थोपवायचा असेल तर नियम पाळावेच लागणार आहे. मात्र, राज्याचं आर्थिक चक्रही चालणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात, शहरात कोरोना कमी झाला आहे, अशा ठिकाणी निर्बंध शिथिल करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोबतच 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
Tags :
Maharashtra Coronavirus Uddhav Thackeray Maharashtra Coronavirus Cases Maharashtra Lockdown Maharashtra Coronavirus News Maharashtra Lockdown News Maharashtra Lockdown Update Maharashtra Lockdown Relaxation Maharashtra Lockdown Restrictions