Bhandara Corona : भंडारा जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने, जिल्ह्यात सध्या एकही कोरोना रुग्ण नाही
भंडारा जिल्हा अखेर कोरोना मुक्त झाला आहे, भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण हा 24 एप्रिल २०२० ला आढळला होता, त्यांनतर तर भंडारा जिल्ह्यात विदारक चित्र पाहावयास मिळाले ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर शेवटचा रुग्ण हा 23 जुलै २०२१ ला आढळून आला होता, व शेवटचा रुग्ण आज कोरोना मुक्त झालं असून त्याला सुट्टी देखील देण्यात आली आहे, आज घडीला जिल्ह्यात सुण्य कोरोणा रुग्ण आहेत, आतापर्यंत जिल्ह्यात 59809 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते, तर 1133 लोकांचा कोरोणामुळें मृत्यू झाला आहे, 58678 रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत, त्यामुळे आता भंडारा जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये आला आहे. जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत जिल्हाभर उपाययोजना राबविल्या होत्या तसेच जे नागरिक कोरोना बाधित आढळले त्यांच्या परिसराला कंटेनमेंट झोन करत उपाययोजना केल्या त्यामुळे आज भंडारा जिल्हा महाराष्ट्रात कोरोना मुक्त पहिला जिल्हा झाला आहे.