CM Thackeray : 'माझा डॉक्टर' म्हणून डॉक्टर्सनी रस्त्यावर उतरावे, खासगी डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील परिस्थिती बिकट झालेली असतानाच आता तिसऱ्या लाटेची टांगती तलवार राज्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार जोरदार तयारी करत आहे. याचच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे 700 खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले.