CM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेत

Continues below advertisement

CM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेत, भिंतींवर कुणाकुणाचे फोटो?

मुंबईचे ज्या शाखेवर बुलडोझर चालवल्यामुळे वाद झाला होता, त्या ठिकाणी नवीन शाखा बांधली आहे, त्या शाखेत सीएम येत आहेत. मुंब्र्यातील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली भेट. मुंब्रा विभागामध्ये शिवसेना मध्ये दोन गट पडल्यानंतर मुंब्रा येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शाखेवरती ताबा घेण्यात आला होता. या शाखेला उबाठा गटाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधी पक्षाचे अनेक नेत्यांनी देखील भेट दिली होती. परंतु आज पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भेटणार शिंदे मुंब्रातील वादग्रस्त शाखेलादीली भेट.

मी राज्यभर प्रचार केला लोकांना विकास पाहिजे, आणि आम्ही विकास केलाय त्यामुळे मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय राज्यात आम्हाला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील अल्पसंख्यांकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि राज्य सरकारने खुप काम केलय त्यामुळे यंदा अल्पसंख्याक मोठ्या संख्येने मतदान करतील असा विश्वास देखील यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram