CM Eknath Shinde Varsha Bangalow :मुख्यमंत्र्यांनी केली आरती; वर्षा निवसस्थानी बाप्पा विराजमान
CM Eknath Shinde Varsha Bangalow :मुख्यमंत्र्यांनी केली आरती; वर्षा निवसस्थानी बाप्पा विराजमान
आज राज्यभरात लाडक्या बाप्पाचे (Ganpati Bappa) आगमन मोठ्या थाटामाटात होत आहे. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. महाराष्ट्रभर गणपतीची अनेक मंदिरे असून या गणपती मंदिरामागे रंजक इतिहास आहे. धुळे (dhule) शहरातील इंग्रज काळातील खुनी गणपती (Khuni Ganpati) हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. खुनी गणपती नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना? हा गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असून खुनी गणपतीचा नेमका इतिहास काय? जाणून घेऊयात.
1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाच रुपांतर हाणामारीत झाल्याने ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, अनेक जखमी झाले आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वखतले तथा खून झाया" या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नाव प्रचलित झाल्याचे सांगण्यात येते. पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचलली. ब्रिटीशांकडून 228 रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली.