Eknath Shinde : मुंबईकडचं थोडं टेंशन आहे...गावी आल्यावर जरा निवांत होतो, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

Continues below advertisement

Eknath Shinde, Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तीन दरे गावात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे पुढील तीन दिवसांसाठी त्याच्या गावी मुक्कामी असणार आहेत. दरम्यान, तीन दिवसांच्या मुक्कामी असले तरी बुधवारी (दि.28) ते काही तासांसाठी बुलढाण्याला रवाना होणार आहेत. दरम्यान,  मुख्यमंत्र्यांनी आज मान्सुनपूर्व बैठकीत राज्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सातारा दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) कोणत्या सूचना दिल्या आहेत. जाणून घेऊयात.. SDRF च्या आठ टीम आहेत त्यांची संख्या वाढवावी. TDRF च्या धर्तीवर महापालिकांनी टीम सुरु कराव्यात. विभागनिहाय SDRF च्या टीम तयार कराव्यात.  दुर्घटना घडल्यानंतर बचावकामी स्थानिक तरूण ताबडतोब जातात त्यांना प्रशिक्षण आणि आवश्यक साहित्य द्यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. 486 ठिकाणी दरडप्रवण स्पॉट आहेत मुंबईमध्ये एमएमआरडीए आणि इतर यंत्रणांच्या अखत्यारीत असलेल्या होर्डिंग्जना मुंबई मनपाचे नॉर्म्स बंधनकारक आहेत. रस्त्यावरील मॅनहोल्सना झाकण आणि गर्डर बसवावे. 486 ठिकाणी दरडप्रवण स्पॉट आहेत. तिथे व्यवस्था करून कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे तसेच जलजन्य आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने औषध गोळ्या यांचा पुरेसा साठा करून ठेवावा असे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram