CM Eknath Shinde Speech Special Report : Winter Session चा शेवटचा दिवस, शिंदेंच्या रडारवर कोण?

CM Eknath Shinde Speech Special Report : Winter Session चा शेवटचा दिवस, शिंदेंच्या रडारवर कोण?
ऐन थंडीच्या दिवसांत, दरवर्षी नागपूरचं हिवाळी अधिवेशन तापतं... तसं ते यंदाही तापलं... २४ दिवस चाललेल्या या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ३६ चा आकडा अनेकदा दिसून आला... तर काही मुद्द्यांवर एकमेकांना चिमटेही घेतले गेले... आज या अधिवेशनाचं सूप वाजतंय. मात्र, शेवटचा दिस गोड व्हावा, या उक्तीला वळसा घालत, मुख्यमंत्री अर्थात सरकारचे कॅप्टन असलेल्या शिंदेंनी जोरदार बॉलिंग केली... कधी उद्धव ठाकरेंवर त्यांनी बाऊन्सर टाकला तर, त्याचवेळी आदित्य ठाकरेंवर आरोपांच्या चेंडूचा भेदक मारा केला... नाव न घेता, शिंदेंनी पेंग्विन, वरूण सरदेसाई, खिचडी घोटाळा तसेच, ऑक्सिजन प्लांट घोटाळ्यावर ठाकरे पितापुत्रांवर आरोपांचे चेंडू भिरकावले. यमक जुळवत, तर कधी नावांची कोटी करत शिंदेंनी... आदित्य राजाच्या कृपेने वरूणराजावर कंत्राटांचा पाऊस पडला... असा गुगली टाकला... त्याचसोबत, घरात बसून राज्य चालत नसल्याचा घणाघात करत, ठाकरेंच्या दिशेने स्पिनर बॉल फेकला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola