CM Eknath Shinde Speech Pune : हा तर ट्रेलर, पिक्चर अजून बाकीय; मोदींची सभा एकनाथ शिंदेंनी गाजवली
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 09:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde Speech Pune : हा तर ट्रेलर, पिक्चर अजून बाकीय; मोदींची सभा एकनाथ शिंदेंनी गाजवली राज्यातल्या लोकसभेच्या दोन टप्प्यांचं मतदान पार पडलंय. मात्र आता कुठं राजकीय रंग चढू लागलाय असं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय प्रचार सभांचा मेगा शो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दोन दिवसांमध्ये सहा सभा घेत आहेत. मराठवाड्यात प्रियंका गांधींनी सभा घेतल्या, तर उद्धव ठाकरेंनी कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रांमध्ये धडाका लावलाय. शरद पवारांनीही बारामतीसह माढ्यात भेटीगाठींसह सभा सुरु केल्यात. तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीनीही पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलंय.