CM Eknath Shinde Speech Nagpur : अंगात नाही बळ, चिमटा काढून पळ... मोदींसमोर विरोधकांवर फटकेबाजी
abp majha web team
Updated at:
10 Apr 2024 08:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde Speech Nagpur : अंगात नाही बळ, चिमटा काढून पळ... मोदींसमोर विरोधकांवर फटकेबाजी
राज्यातील काही नेते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करतात. पण नरेंद्र मोदी अशा नेत्यांकडे लक्ष देत नाहीत. मोदींनी त्यांच्याकडे नजर फिरवली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल, अशी खोचक टिप्पणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते बुधवारी रामटेकमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.