Eknath Shinde Banner : शिंदे यांचं भाषण सुरू असताना बॅनर उडाला, वादळी वाऱ्याचा फटका

Eknath Shinde Banner : शिंदे यांचं भाषण सुरू असताना बॅनर उडाला, वादळी वाऱ्याचा फटका. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल वाशिम जिल्ह्याच्या दौरावर होते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराचे एकनाथ शिंदे हे वाशिमच्या मंगरूळपीर आले असता काल त्यांची मोठी प्रचार सभा घेण्यात आली या दरम्यान काल एकनाथ शिंदे भाषणासाठी स्टेजवर उभे राहिले असता वादळी वारे आलं आणि सभास्थळी असलेल्या मोठं बॅनर पोस्टर फाटून उडून गेले यावरून एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले ही हवा मोदीची आहे ही महायुतीची हवा आहे. वादळ  वाऱ्याशी टक्कर घेणार आपण मावले आहो आमची महायुती वादळाशी टक्कर घेणार  आहे.  अनेक वादळ नंतर  हि आमची महायुती मजबुतीने उभी आहे  टेन्शन घेऊ नका टेन्शन  देणारे आम्ही मावळे आहो  हवा महायुतीची आहे मोदीची हवा आहे  राजश्री पाटील ची हवा आहे वादळी वाऱ्यात खंबीर पणे उभी राहणारी महायुती आहे ही निवडणूकराजश्री पाटीलची नाही तर  मोदीना तिसऱ्यांदा प्रधानमन्त्री बनवणारी  निवडणूक आहे अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola