Eknath Shinde : दांडपट्टा फिरवायला महायुती सरकार मागेपुढे पाहणार नाही, विरोधकांवर हल्लाबोल
Continues below advertisement
मुंबई : विरोधकांना शेतकऱ्यांचं काही देणेघेणं नाही, काय दिले त्याचा हिशोब द्यायचा होता, आकडे आमच्याकडे आहेत. त्यामुळे शेतकरी कोमात आहे, अशा भाषा योग्य नाही, हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही तोंडाला पाने पुसली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून चौफेर टीका होत असल्याने सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, तुम्ही 50 हजार दिले नाही, आम्ही खात्यावर जमा केले, तुम्ही केवळ पोकळ घोषणा केल्या. आमचं काम भरीव आहे
Continues below advertisement