CM Eknath Shinde : 34 जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालयं उभारणार : मुख्यमंत्री

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य सेवांबद्दल अतिशय महत्त्वाची घोषणा केली. ३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दोन आठवड्यात आराखडा तयार करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. २०३५ पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी आरोग्याचे सर्वंकष व्हिजन तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती देखील नेमण्यात येणार आहे. त्यासोबतच, आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्यात येणार आहेत, तसंच जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन निधीमधून औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही जिल्ह्यातून रुग्णालयांमधून औषधे नाहीत अशी तक्रार येणार नाही हे कटाक्षाने पाहावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram