ABP News

CM Eknath Shinde : त्यांना अजूनही पटत नाही की मी सीएम झालोय - एकनाथ शिंदे

Continues below advertisement

CM Eknath Shinde : त्यांना अजूनही पटत नाही की मी सीएम झालोय - एकनाथ शिंदे 

 कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिण बाजूने नागपूर-रत्नागिरी महामार्गाची (Nagpur Ratnagiri National Highway) काम प्रगतीपथावर असतानाच तसेच शेतकऱ्यांचा मोबदल्यासाठी आणि पाणंद रस्त्यांसाठी वाद सुरु आहे. हे सुरु असतानाच आता जिल्ह्याच्या उत्तर बाजूने सुद्धा नागपूरमधील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) जात असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. या महामार्गामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 59 गावांमध्ये शेकडो एकर जमिनी प्रभावित होणार असल्याने हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातून एकमुखाने होत आहे.

मात्र, शक्तीपीठवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन तफावत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी विरोधी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात दिली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी 21 जून रोजी केलेल्या ट्विटमध्ये महामार्ग रद्द करण्याचे कोणतेही संकेत दिले नव्हते. मात्र, फेरविचार करण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका अधिकृत समजायची की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली ग्वाही अधिकृत समजायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram