CM Eknath Shinde मिलींद नार्वेकरांच्या घरी; गणपती रायाचं घेतलं दर्शन
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शनासाठी भेट दिल्यामुळं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं नाही. त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं. पण नार्वेकर यांच्या गणपतीच्या दर्शनाला जाणं टाळलं. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा होणं स्वाभाविक होतं.
Continues below advertisement