CM Eknath Shinde : नजर जागांवर, सवाल मित्रांवर; जागावाटपावरून नाराजीला वाचा फोडली

Continues below advertisement

CM Eknath Shinde : नजर जागांवर, सवाल मित्रांवर;  जागावाटपावरून नाराजीला वाचा फोडली आपण उठाव करून धाडस केलं म्हणून मित्र पक्षाला सत्तेची फळं चाखता आली. त्यामुळे कुणी कितीही सांगितलं तरी, आपलं महत्त्व कमी होत नाही असंही काही उपस्थित आमदार म्हणाले…  राज्यातील परभणी आणि उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ शिवसेनेनं मित्र पक्षाला दिले. आपण युती धर्म प्रामाणिकपणे पाळतोय.  पण आपले मित्र पक्ष युती धर्म प्रामाणिकपणे पाळतायेत का…?  रायगड आणि शिरुर मतदारसंघात आपल्या आमदारांनी अपमान गिळून महायुती उमेदवाराच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. शिवसेनेचे उमेदवार ज्या मतदारसंघात आहेत तिथे मित्र पक्षानेही युतीधर्माचे पालन करत सहकार्य आणि मदतीसाठी तयार असायला हवे. अशी भूमीका उपस्थितीत मंत्र्यांनी मांडली.  ठाणे आपलेच आहे. नाशिक रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ आपलाच आहे…. ते सोडायची नाहीत…  पालघरही देऊ नका अशी भूमिका मांडण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram