CM Eknath Shinde Maharashtra Tour : मुख्यमंत्री शिंदेंचं शक्तीप्रदर्शन? आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
राज्यात सत्तांतरानंतर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक आणखी वाढलीय. त्यात शिंदे गट आणि भाजपच्या काही आमदारांनी दिल्ली गाठलीय. अमित शाह यांच्याशी अद्याप चर्चा बाकी असल्यानं विस्तार रखडला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघतायत. शिवसेनेत अभूतपूर्व बंड करून हादरा देणाऱ्या शिंदे यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. बंडानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिकपासून औरंगाबादपर्यंत बंडखोरांच्या मतदारसंघात दौरा केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हेदेखिल नाशिकपासून औरंगाबादपर्यंत दौऱ्यावर निघत आहेत. या दौऱ्यात शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिंदे उत्तर देणार का याचीही उत्सुकता आहे.