CM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?

CM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?

मी मुख्यमंत्री पदाचा कधीही गाजावाजा केला नाही. मी तुमच्यातील सर्वसामान्य कॉमन मॅन असून या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणून मला सुपरमॅन करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सोमवारी शहरातील कामतघर येथील काटेकर मैदानावर  महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्व बहिणींसाठी असून त्यात कोणताही जाती धर्माचा भेदभाव नाही. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकले असून विरोधक लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेत थेट कोर्टात पोहोचले आहेत मात्र कोर्टानेही त्यांना फटका आले असून तुम्ही अडीच वर्षात काय केले ते सांगा आणि आम्ही दोन वर्षात काय केले हे सांगतो असे आवाहन देखील शिंदे यांनी विरोधकांना केले आहे. शेतकरी विज बिल माफ करून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत योजनेमुळे विरोधक ही गॅसवर आले असल्याचे मिश्किल टीका देखील यावेळी शिंदे यांनी विरोधकांवर केली. भिवंडी शहरातील नागरिकांच्या वीज दरावर देखील नियंत्रण आणून भिवंडी शहर ठाण्यासारखे स्मार्ट करू असे आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola