CM Eknath Shinde : विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली,शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र
CM Eknath Shinde : विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली,शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र
मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे, यासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहे. संभाजीनगरच्य टीव्ही.सेंटर येथील मैदानावर हा कृतज्ञता सोहळा पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण कृतज्ञता करण्यासारख कोणतेही काम मी केले नाही, ती माझी जवाबदारी आणि तुमचा अधिकार आहे.... बाबासाहेबांचे विचार पुढे न्यायचं आहे..... बाबासाहेब यांचं संभाजीनगरवर विशेष प्रेम आहे बाबासाहेब यांचा मोठा पुतळा आपण शहरात उभारत आहे उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच काम करत आहे बाळासाहेब म्हणाचे नोकऱ्या मिळतील पण नोकऱ्या देणारे हात तयार करा.... बाबासाहेब यांनी देशासाठी दिलेले योगदान अनमोल होते बाबासाहेबांच्या अनुयायांचा वोटबँक म्हणून वापर केला, त्यांना तुम्ही धडा शिकवणार का बाबासाहेब यांना दोन वेळा काँग्रेसने पराभव केला, सर्वात जास्त बाबासाहेब यांचा तिरस्कार काँग्रेस यांनी केला आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे आपण बाबासाहेब यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही आपल्या बुद्धीच्या जीवावर बाबासाहेब देशाच्या संविधानाचे शिल्पकार झाले शेरो शायरी बाबासाहेब यांच्यावर बाबासाहेब यांच्याबद्दल किती बोलावे कमीच आहे एका बहिणीला तिच्या कुटुंबाला धीर लागावा म्हणून दीड हजार रुपये महिन्याला दिले जात आहे आम्ही लाडकी भाऊ देखील आणला बार्टीला देखील आपण न्याय देणार आहे.. विरोधकांच्या पायाखालीची वाळू सरकली बहीण लाडकी आणि भरली धडकी अशी त्यांची परिस्थिती आहे काही लोक म्हणतात भीक नको ,,,,आमच्या बहिणीला भिकारी म्हणतात या सावत्र भावापासून सावध राहा कोणीतरी कोर्टात गेले ,पण त्यांची याचिका फेटाळली आणि न्यायालयाने बहिणीला न्याय दिला तुम्ही दिली नाही, तुमची घेण्याची आमची देण्याची वृत्ती आहे.. राज्यात दीड कोटी अर्ज दाखल झाले ,त्यामुळे विरोधकांची पोटदुखी आहे काही खालच्या पातळीवर बोलत आहे काही लोक ठाण्यात येऊन बोलून गेले आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आम्हाला दिल्ली समोर लोटांगण घालतात म्हणणारे, तीन-तीन दिवस दिल्लीत मुक्कामी असतात... तिकडे ताल कटोरा मैदान आहे तिकडे हे का गेले होते आम्हाला माहीत आहे.