Eknath Shinde Full Speech : ना टार्गेट बदललं ना स्टाईल... पावसाळी अधिवेशनातील शेवटचं भाषण ABP Majha

Eknath Shinde Full Speech : ना टार्गेट बदललं ना स्टाईल... पावसाळी अधिवेशनातील शेवटचं भाषण ABP Majha


मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला. विधानपरिषदेमध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्याचवेळी विधानसभेतही विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. आज आठवड्याच्या अंतिम प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोमणे मारत राज्य सरकारने केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली. 

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. ते म्हणाले की, आमच्या सरकारने चांगलं काम केल्यानं विरोधक धास्तावले आहेत, गोंधळलेले आहेत. विरोधकांचा आत्मविश्वास डगमगलेला आहे. 

राज्यातील उद्योगांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दाओसमध्ये जाऊन किती करार झाले हे मला माहीत नाही, ते सर्व गुलदस्त्यात आहे. मात्र श्वेतपत्रिका काढण्याच धाडस आमच्या उद्योग मंत्र्यांनी केलं, राज्यात 1 लाख 18 हजार कोटीची परदेशी गुतंवणूक आली 

अहंकारामुळं राज्याचं नुकसान होत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, आमचं सरकार हे परफॉर्मन्स करणारं सरकार आहे, 24 तास काम करणारं सरकार आहे. तुमचं सरकार हे शासन आपल्या घरी होतं. तर आमचं सरकार हे शासन आपल्या दारी सरकार आहे. फेसबुकवरुन घरात बसून लाईव्ह करणारे सरकार नाही.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola