CM Eknath Shinde Davos Visit : देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक, मुख्यमंत्र्यांचा दावा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde Davos Visit : देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक, मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
स्वित्झर्लंडच्या दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दोन दिवसात साडे चार लाख कोटींचे सामंजस्य करार झाले.
अमेरिका, स्वित्झर्लंड, युके, कतार, दक्षिण कोरिया येथील नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारशी करार केले आहेत. जिंदाल, अदानी, गोदरेज, लक्ष्मी नारायण मित्तल या उद्योजकांनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवलंय. अदानी उद्योग समूह पुढील दहा वर्षात ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. दरम्यान उद्योगांसोबत सर्वात जास्त सामंजस्य करार करण्यात यशस्वी झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. सोबत देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक असल्याचा दावा त्यांनी केला.