Maharashtra Politics: 'महाविकास आघाडी ही महा कन्फ्यूज आघाडी', Eknath Shinde यांचा घणाघात
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार निशाणा साधला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभव समोर दिसत असल्यानेच MVA नेते रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला आहे. 'महाविकास आघाडी ही महा कन्फ्यूज आघाडी आहे, कोण काय बोलतंय त्यांचं त्यांनाच समजत नाही,' अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. जेव्हा-जेव्हा MVA चा पराभव होतो, तेव्हा ते निवडणूक आयोग आणि न्यायालयावर आरोप करतात, पण विजयानंतर मात्र शांत बसतात, असेही शिंदे म्हणाले. तर MVA नेते पराभूत मानसिकतेत असून पराभवानंतरचे नरेटिव्ह सेट करण्यासाठी ही 'नऊटंकी' करत आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement