Eknath Shinde : येत्या फेब्रुवारीत आरक्षणासाठी विशेष अधिवेशन,न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही
Continues below advertisement
CM Eknath Shinde : येत्या फेब्रुवारीत आरक्षणासाठी विशेष अधिवेशन , मागासवर्ग आयोगाचा अहवाल महिनाभरात सादर होईल
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द असल्याची ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिलीय. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एका महिन्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय..तर नोंदी सापडलेल्यांच्या कुटुंबीयांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Special Session Parliament Session ABP Majha CM Eknath Shinde Maharashtra Politics