CM Eknath Shinde : शिंदे, फडणवीस, सामंतांमध्ये बैठक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा

Continues below advertisement

CM Eknath Shinde : शिंदे, फडणवीस, सामंतांमध्ये बैठक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री अडीच तास वर्षा बंगल्यावर चर्चा झाली.. या बैठकीला  उदय सामंत, शंभूराज देसाई, आणि मराठा आंदोलनाचं एक महत्त्वाचं आणि प्रतिष्ठीत नाव विनोद पाटील सुद्धा  उपस्थित होते..  या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या जागेवर उदय सामंत आपल्या भावासाठी आग्रही आहेत. शिवसेनेला ही जागा सोडल्यास मोठ्या ताकदीने ही जागा निवडून आणू असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केल्याचं समजतंय.तर पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजतंय.. याचसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जातंय. छत्रपती संभाजीनगरबाबत एकनाथ शिंदेंकडून मराठा नेते आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील इच्छुक आहेत. पण भाजप सुद्धा या जागेसाठी आग्रही असल्याचं सूत्रांकडून समजतंय. तर या जागेसाठी भाजपचाच उमेदवार मैदानात उतरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram