CM Shinde vs DCM Pawar : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष?
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरुवात झालीय का अशी चर्चा सुरु झालीय. अजित पवारांनी शिरुर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. त्यानंतर याच मतदारसंघात शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेतली आणि शक्तिप्रदर्शन केलं. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला. कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या असे आदेश दिलेत.
Continues below advertisement