Voter List Row: 'विरोधकांना झालेला लाभ चव्हाट्यावर आणू', CM Devendra Fadnavis यांचा थेट इशारा

Continues below advertisement
मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि विरोधकांमध्ये (Opposition) आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'लोकसभेला विरोधकांना मतदार याद्यातील घोळामुळे जो लाभ झाला, तो आता आपण समोर आणू,' असा थेट इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिला आहे. मतदार याद्यांमध्ये सुधारणा व्हावी ही आपली भूमिका असल्याचे सांगत, विरोधक निरर्थक कांगावा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक महायुती म्हणून लढणार असून १०० पेक्षा जास्त जागा जिंकून महापौर महायुतीचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola