Kumbh Mela Project:त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एनएमआरडीच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांची तात्पुरती स्थगित

Continues below advertisement
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणावरून निर्माण झालेला वाद अखेर मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NMRDA च्या भूसंपादन कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली असून, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आता या परिसराची पाहणी करणार आहेत. 'ही अनावश्यक अतिरिक्त जागा आहे, ही जागा घेऊ नये', अशी भूमिका घेत स्थानिक नागरिक, साधू-महंत आणि आमदार हिरामण खोसकर यांनी कारवाईला तीव्र विरोध केला होता. कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. यासाठी दुभाजकापासून दोन्ही बाजूंना ५० मीटर जागा ताब्यात घेण्याची कारवाई NMRDA ने सुरू केली होती, ज्यामुळे अनेक घरे आणि व्यावसायिक बांधकामे पाडण्याची भीती निर्माण झाली होती. अखेर, आमदार खोसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा स्थगितीचा निर्णय घेण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola