Infra War Room: 'पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करा', CM Devendra Fadnavis यांचा कंत्राटदारांना इशारा.
Continues below advertisement
राज्यात रखडलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी कंत्राटदारांची खरडपट्टी काढली आहे. 'जगात इतक्या धीम्या गतीनं कुठंच काम होत नाही, पाच वर्षांची वेळ मागू नका अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करा' असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी वॉर रूम बैठकीत दिला. राज्यभरातील अनेक प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाबद्दल तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वॉर रूममध्ये (War Room Meeting) त्याचा आढावा घेतला. पाच-सात वर्षे चालणारे 'जनरेशनल प्रोजेक्ट्स' (Generational Projects) मान्य केले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कामासाठी लागणारा वेळ निश्चित करण्यात आला असून, रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी टास्क-वाईज विभागणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement